गोपनीयता धोरण :-

www.globalglaze.com ("वेबसाईट") या वेबसाईटद्वारे किंवा इतर कोणत्याही स्वरूपात आपणाद्वारे ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. (Glaze Trading India Pvt. Ltd.) ("ग्लेज") ला पुरविण्यात येणाऱ्या माहितीसाठी कंपनीद्वारे निश्चित करण्यात येणाऱ्या पॅरामिटरच्या सबंधित आपणास माहिती करून देण्याचा या गोपनीयता धोरणाचा उद्देश आहे. जेव्हा आपण आमच्या वेबसाइटचा वापर करता, तेव्हा आपणाद्वारे आमच्या वेबसाइटवर प्रविष्ट करण्यात येणारी खाजगी माहिती सुरक्षित करण्याचे आम्ही वचन देतो. जेव्हा आपण आमची उत्पादने आणि सेवा वापरता, तेव्हा आम्ही कोणती माहिती गोळा करतो हे आपणास माहित व्हावे आणि तिला आम्ही का गोळा करतो आणि आम्हाला आपल्या संपर्कात राहण्यासाठी तिचा कशा प्रकारे वापर करतो या बाबींचे वर्णन हे विधान करते.
वेळोवेळी धोरणामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार ग्लेज (Glaze) कडे सुरक्षित आहे.
या गोपनीयतेच्या विधाना ("स्टेटमेंट") मध्ये :-
"आम्ही", "आमचे" आणि "आमच्या द्वारे" या शब्दांचा संदर्भ ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. (Glaze Trading India Pvt. Ltd.) ("ग्लेज") आणि ग्लेज (Glaze) च्या मालकीच्या अन्य बाबींशी आहे.
"आपण" आणि "आपले" या शब्दांचा संदर्भ या वेबसाइट वापर करणारे वितरक, ग्राहक, पाहुणे, वापरकर्ते आणि इतर व्यक्ती यांच्याशी आहे.

1) माहितीचे संकलन

आपण पूर्णपणे खरी, अचूक आणि सद्यकालीन माहिती द्याल. आपणाद्वारे आम्हाला देण्यात आलेली सर्व माहिती सुरक्षित आणि अभेद्य स्टोरेजमध्ये ठेवली जाईल. आपणास माहित असलेली आपली अपलाईन, आपले पाहुणे आणि आपल्या मालकीच्या वस्तू यांविषयी सुद्धा आम्ही माहिती गोळा करू शकतो.
अनेक चरणांवर वेबसाईटच्या माध्यमातून ग्लेज (Glaze) खालील प्रमाणे आपल्या माहिती गोळा करू शकते:
नोंदणी; बँकेच्या तपशीलाचे स्टोरेज; सर्वेक्षणे आणि जाहिराती

a) नोंदणी

ग्लेज (Glaze) चे अधिकृत वितरक बनण्यासाठी आपणास नांव, वय, जन्म दिनांक, पत्ता, संपर्क माहिती, ई-मेल पत्ता, लिंग आणि उद्योग अशी आपली वैयक्तिक माहिती पुरविणे आवश्यक आहे.

b) बँकेच्या तपशिलाचे स्टोरेज

आपण आणि ग्लेज (Glaze) च्या दरम्यान पेमेंटच्या प्रक्रियेसाठी आपणास आपल्या बँकेचा तपशील पुरविणे आवश्यक आहे कारण आम्ही आपणास अकाऊंट पेयी चेक किंवा एनईएफटी ( NEFT) बँक हस्तांतरण द्वारे पेमेंट करतो. अशा माहितीचे संरक्षण करणे हे आमच्यासाठी बंधनकारक आहे आणि आम्ही आपणास आश्वासन देतो की जर आपली इच्छा नसेल तर अशी माहिती वेबसाइटवर साठवून ठेवली जाणार नाही.

c) अभिप्राय आणि तक्रारी

या वेबसाइटद्वारे आपल्या वैयक्तिक ओळखता येण्याजोग्या माहितीचा उल्लेख करून आपण कोणत्याही वेळी ग्लेज (Glaze) ची उत्पादने आणि सेवा यांविषयी आपला अभिप्राय कळवू शकता किंवा तक्रार करू शकता जेणेकरून आपण आपली अधिक सुधारित उत्पादने आणि सेवांद्वारे सेवा करू शकू.

2) आपल्या माहितीचा वापर

a)   आपले कार्य करण्यासाठी जेव्हा जेव्हा आपण आमच्या वेबसाइटवर लॉग इन करू इच्छिता, तेव्हा तेव्हा आपणास प्रमाणीकृत करण्यासाठी आम्ही आपल्या माहितीचा वापर करू शकतो. आपणास आपल्या खात्यामध्ये लॉगिन करण्यासाठी पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

b)   आपल्या विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी; सेवेची देखरेख करण्यासाठी आणि तिला पुरविण्यासाठी; आपल्या आयडी (ID) खात्याची देखभाल करण्यासाठी आम्ही आपल्या माहितीचा वापर करू शकतो.

3) तिसऱ्या पक्षाशी आपली माहिती शेअर करणे

a)    आम्ही आपणास आश्वासन देतो की निर्दिष्ट केलेले नसेल किंवा कायद्याने आवश्यक नसेल तो पर्यंत आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीला तिसऱ्या पक्षाकडे शेअर, वितरीत, विक्री, व्यापार, भाड्याने देणे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पोहोचविणार नाही.

b)    आपणास योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपणास एक अनुकूल अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही आपल्या अपलाईनशी किंवा कोणत्याही सर्वोच्च पातळीवरील वितरकाशी आपली माहिती शेअर करू शकतो. आपल्या अपलाईनला आपल्या वैयक्तिक माहितीला शेअर न करण्यास किंवा तिचा गैरवापर न करण्यास आणि आपल्या माहितीचा वापर करताना गोपनीयता धोरणाच्या अटींचे पालन करण्याचे आश्वासन देणे बंधनकारक आहे.

c)    आमची उत्पादने आणि सेवांबद्दल अपडेट पाठविण्यासाठी आणि आपल्या पेमेंटच्या प्रक्रियेसाठी सुद्धा आम्ही आपली माहिती तिसऱ्या पक्षांशी शेअर करू शकतो.

d)    आपली माहिती तिसऱ्या पक्षांशी शेअर करताना आम्ही या बाबीचे आश्वासन देतो की आपली माहिती कंत्राटी आणि तांत्रिक संरक्षणच्या अंतर्गत वापरली जात आहे.

4) व्यवसाय बदली (ट्रांस्फर्स)

ग्लेज (Glaze) च्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागाचे विलीनीकरण, विक्री, संयुक्त उपक्रम, नेमणूक, हस्तांतरण किंवा अन्य कोणतीही व्यवस्था या बाबींच्या संदर्भात आमच्याद्वारे आपणाकडून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या कोणत्याही भागास किंवा तिच्या संपूर्ण भागास तिसऱ्या पक्षाकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो.

आपण आपली माहिती पुन्हा प्राप्त करू शकता व तिला अपडेट करू शकता

कोणत्याही वेळी विपणनाच्या उद्देशांसाठी आमच्या वेबसाइटवर आपल्याद्वारे सादर करण्यात आलेल्या माहितीला आपण पुनर्प्राप्त करू शकता, कृपा करून आमच्याशी संपर्क साधा जेणेकरून आम्ही आमच्या रेकॉर्डमध्ये आपली माहिती अपडेट करू किंवा आपण वेबसाइटवर ऑनलाईन जाऊन आपली स्वतः ची माहिती अपडेट करू शकता.

5) कुकीज

वेब सर्व्हरद्वारे वेब ब्राउझरला पाठविलेला एक संदेश. ब्राउझर हा संदेश एका मजकूर (टेक्स्ट) फाइलमध्ये साठवून ठेवतो. ब्राउझरने त्या पृष्ठाची सर्व्हरकडून विनंती केल्यानंतर प्रत्येक वेळी त्या संदेशास सर्व्हरकडे पुन्हा पाठविले जाते.

कुकीजचा मुख्य उद्देश आहे वापरकर्त्यांची ओळख करणे आणि शक्यतो त्यांच्यासाठी सानुकूलित (कस्टमाईज्ड) वेब पृष्ठे तयार आहे. जेव्हा आपण कुकीजचा वापरू करून वेबसाइटमध्ये प्रविष्ट होता, तेव्हा आपले नांव व आपल्या रुची अशा प्रकारची माहिती देण्यासाठी आपणास फॉर्म भरण्यासाठी सांगितले जाऊ शकते. ही माहिती एका कुकीमध्ये पॅकेज केली जाते आणि नंतर तिला आपल्या वेब ब्राउझरमध्ये नंतरच्या वापरासाठी साठविण्यात येते. पुढील वेळी जेव्हा आपण त्याच वेब साइटवर जाता, त्यावेळी आपले ब्राउझर या कुकीला आपल्या वेब सर्व्हरकडे पाठवेल.

आपणास सानुकूलित (कस्टमाईज्ड) वेब पृष्ठे सादर करण्यासाठी सर्व्हर या माहितीचा वापर करू शकतो. त्यामुळे, उदाहरणार्थ, फक्त एका सर्वसामान्य (जेनेरिक) पृष्ठा ऐवजी आपण आपले नांव असलेले स्वागत पृष्ठ पाहू शकता.
कुकी या शब्दाची उत्पत्ती मॅजिक कुकीज नांवाच्या युनिक्स (UNIX) वस्तूंपासून झाली आहे. एखादा वापरकर्ता किंवा कार्यक्रम यांना जोडलेली ही टोकन असतात आणि वापरकर्ता किंवा कार्यक्रम यांनी प्रविष्ट केलेल्या क्षेत्रांप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल होतो.
तथापि, आपल्या वेब ब्राउझर (इंटरनेट एक्सप्लोरर [Internet explorer], मोजिला फायरफॉक्स वेब ब्राऊजर [Mozilla Firefox Web browser], ऑपेरा वेब ब्राउझर [Opera Web Browser], गुगल क्रोम [Google Chrome]) नुसार कुकींना फक्त सानुकूल करून (कस्टमाईझ करून) आपल्या प्राधान्यानुसार आपण आपल्या कुकीची सेटिंग बदलू शकता.

6) कुकीमध्ये कोणत्या माहितीचा साठा केला जातो ?

जास्त करून एखाद्या कुकीमध्ये ब्राउझर बद्दल माहिती असलेले स्ट्रिंगचे टेक्स्ट समाविष्ट असेल. काम करण्यासाठी, एखाद्या कुकीला आपला पत्ता माहित करण्याची आवश्यकता नाही; तिला फक्त आपल्या ब्राउझरला लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. काही वेब साइट्स आपणाविषयक अधिक वैयक्तिक माहितीचा साठा करण्यासाठी कुकीजचा जरूर वापर करतात. तथापि, असे तेव्हाच केले जाऊ शकते, जेव्हा आपण स्वत: त्या वेब साइटला ती वैयक्तिक माहिती पुरविलेली असेल. आपल्या कुकीज फोल्डरमध्ये प्रवेश करून अन्य पक्षाद्वारे अनधिकृत वापर टाळण्यासाठी कायदेशीर वेब साइट्स कुकीमध्ये साठविण्यात आलेली वैयक्तिक माहिती कूटबद्ध (एंक्रिप्ट) करतील.

कुकीजकडे सहा घटक (पॅरामिटर्स) आहेत ज्यांना त्यांच्याकडे पाठविले जावू शकते :

  • कुकीचे नांव.
  • कुकीचे मूल्य.
  • कुकीच्या समाप्तीच्या कालावधीचा दिनांक - यामुळे कुकी आपल्या ब्राऊझरमध्ये किती कालावधीसाठी सक्रिय राहील ते ठरविले जाते.
  • ज्या मार्गा (पाथ) साठी कुकी वैध आहे तो मार्ग (पाथ) - यामुळे यूआरएल (URL) च्या ज्या मार्गा (पाथ) साठी कुकी वैध आहे तो यूआरएल (URL) चा मार्ग (पाथ) निश्चित केला जातो. त्या मार्गा (पाथ) च्या बाहेरील वेब पृष्ठे कुकीचा वापर करू शकत नाहीत.
  • कुकी ज्यासाठी वैध आहे ते डोमेन. जेव्हा एखादी साईट एखाद्या डोमेनमधील अनेक सर्व्हरचा वापर करते, तेव्हा यामुळे कोणत्याही सर्व्हरवरील पृष्ठांसाठी कुकीला प्रवेश दिला जातो.
  • एक सुरक्षित कनेक्शनची आवश्यकता - ही बाब हे दर्शविते की एसएसएल (SSL) चा वापर करणाऱ्या एखाद्या साईटसारख्या फक्त एखाद्या सुरक्षित सर्व्हरच्या परिस्थीतीमध्ये कुकीचा वापर केला जाऊ शकतो.

7) मी कुकीजला कशा प्रकारे सक्षम किंवा अक्षम करू शकतो / शकते ?

हा विभाग आपणास कुकीजला कसे सक्षम करावे (कुकीजला चालू करणे) आणि कसे अक्षम करावे याविषयी सुद्धा आपणास सांगेन. कुकीजची आपल्या वेब ब्राउझरद्वारे देखभाल केली जाते, म्हणून त्यांना सक्षम किंवा अक्षम करण्याची पद्धत आपण वापरत असलेल्या ब्राउझरवर अवलंबून असेल.

a) मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर 8.0 किंवा 9.0 (Microsoft Internet Explorer 8.0 or 9.0): - मेनूमधून 'साधने > इंटरनेट पर्याय' निवडा आणि नंतर 'गोपनीयता' टॅब उघडा - आपण नंतर कुकींच्या विविध श्रेणींना अवरोधित करण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी स्लायडरला समायोजित करू शकता. वैकल्पिकरित्या, 'प्रगत' वर क्लिक करून एकतर आपण व्हिजीट देत असलेल्या वेब साईटवरून (प्रथम पक्ष कुकीज) निर्माण होणाऱ्या कुकीजला किंवा आपण व्हिजीट देत असलेल्या वेब साईटच्या व्यतिरिक्त वेब साईटवरून निर्माण होणाऱ्या कुकीजला स्वीकारू, ब्लॉक करू शकता किंवा सूचित करू शकता (सामान्यत: तिसऱ्या पक्षाच्या कुकीज या सामान्यतः एखाद्या जाहिरातकर्ताच्या वेब साईटवर होस्ट केलेल्या बॅनर जाहिरातीद्वारे वापरल्या जातात.)

b) फायरफॉक्स 7.0 (Firefox 7.0): - मेनूमधील 'साधने > पर्याय' चा वापर करा (कदाचित फायरफॉक्स [Firefox] बटणाच्या अंतर्गत असू शकते) नंतर 'प्रायव्हसी' टॅब निवडा. 'फायरफॉक्स (Firefox) असे करेल:' ला 'हिस्ट्रीसाठी कस्टम सेटिंगचा वापर करा' हा पर्याय सेट करा. आता आपण ज्या वेबसाइटना भेट देता त्यांच्यासाठी आणि तिसऱ्या पक्षाच्या वेबसाइटसाठी कुकीजला सक्षम करायचे आहे किंवा नाही आणि जर आपण निवड केली तर त्या किती कालावधीसाठी चालू राहतील या बाबींची निवड करू शकता. काही विशिष्ट वेबसाइटसाठी आपण सेटिंगला खोडून टाकण्यासाठी (ओव्हरराईड करण्यासाठी) सुद्धा आपण 'अपवाद' बटणाचा वापर करू शकता.

c) फायरफॉक्स 3.0 (Firefox 3.0): - मेनूमधील 'साधने > पर्याय' निवडा, नंतर 'गोपनीयता' टॅब निवडा. येथे आपण कुकीज सक्षम आहेत किंवा नाहीत, आणि जर आपण त्यांची निवड केली तर त्या किती कालावधीसाठी चालू राहतील याची निवड करू शकता. काही विशिष्ट वेबसाइटसाठी आपण सेटिंगला खोडून टाकण्यासाठी (ओव्हरराईड करण्यासाठी) सुद्धा आपण 'अपवाद' बटणाचा वापर करू शकता.

d) गुगल क्रोम (Google Chrome) 5.0: - मेनूमध्ये 'सानुकूलित आणि नियंत्रित करा' ची निवड करा आणि नंतर 'अंडर द बॉनेट' टॅब उघडा. 'गोपनीयता' विभागात, 'सामग्री सेटिंग' बटणावर क्लिक करा आणि 'कुकीज' टॅब उघडा. कुकीचे आवश्यक वर्तन सेट करा आणि विशिष्ट वेबसाइटना काँफिगर करण्यासाठी 'अपवाद ...' (आवश्यक असल्यास) बटणाचा वापर करा .

e) ऍपल सफारी 5.0 (Apple Safari 5.0): - 'सेटिंग' मेनूमध्ये 'प्राधान्ये' निवडा आणि नंतर 'सुरक्षा' टॅब उघडा. कुकीचे आवश्यक वर्तन सेट करा.

टीप: कुकीला अक्षम केल्याने काही वेबसाईटला योग्यरितीने कार्य करण्यासाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्याचा अर्थ असा होईल की ज्या माहितीला एखाद्या कुकीमध्ये सामान्यपणे साठवून ठेवले जाऊ शकते त्या माहितीला आपणास पुन्हा प्रविष्ट करावे लागू शकते.

8) संशोधन

आपल्या www.globalglaze.com या वेबसाईटवर लेखी सूचनेच्या माध्यमातून या धोरणात वर्णन केलेल्या कोणत्याही मुद्द्यामध्ये सुधारणा, दुरस्ती किंवा संशोधन करण्याचा अधिकार ग्लेज (Glaze) राखून ठेवत आहे. जर आपण अशा दुरुस्त्यांशी सहमत नसाल, तर अशी सुचना प्राप्त झाल्याच्या 30 दिवसांच्या आत आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. ग्लेज (Glaze) शी आपल्या अविरत संबंधाचा असा अर्थ घेतला जाईल की सर्व सुधारणांसाठी आपली स्वीकृती आहे.

9) अस्वीकरण

वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती आणि सूचनांच्या संदर्भात जर इंग्रजी व अन्य भाषांच्या आवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची असमानता, त्रुटी किंवा विसंगती असेल तर अशा स्थितीमध्ये इंग्रजी आवृत्तीलाच आदर्श मानले जावे.

10) आमच्याशी संपर्क करा

आपल्या पुढील क्वेरी किंवा टिप्पण्यांसाठी, थेट आमच्या वेबसाइटद्वारे किंवा या वेबसाईटद्वारे आपणास पुरविण्यात आलेल्या अन्य ई-मेलद्वारे लिंकद्वारे किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने आपण संपर्क साधू शकता. आम्ही आपणास तातडीने उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आम्ही या माहितीचा वापर प्रश्नांना प्रतिसाद देण्यासाठी करतो आणि आमच्या ग्राहक सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या टिप्पण्यांची नोंद करू शकतो.