Home  /  Products  /  Rupabham

तुमचे व्यक्तिमत्व जोपासणे

तुमची सुंदर दिसण्याची महत्वाकांक्षा आम्हाला खूप प्रेरणा देते. ती जोपासण्यासाठी आम्ही विशेष तर्‍हेने निर्माण केली आहेत अद्वितीय उत्पादने जी वय, लिंग किंवा त्वचेचा रंग ह्याची पर्वा न करता कुणालाही वापरता येतात.

ही उत्पादने नियमित वापरल्याने वैयक्तिक स्वच्छतेची खात्री असते आणि तुमचा मूळचा सुंदर तजेला परत आणून त्वचेची सुंदरता वाढते.

रूपभमची कल्पकता दोन शब्दांच्या संयोजनात दडलेली आहे – रूप म्हणजे ‘दिसणे’ आणि आभम म्हणजे ‘तजेला’.

जीवनात एकूणच सगळ्या बारकाव्यांकडे लक्ष द्यावे असे आम्हाला वाटते. त्याप्रमाणे, प्रत्येक रूपभम उत्पादनसुद्धा मनुष्याच्या गरजा व हवामान आणि पर्यावरण ह्यांची परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक निर्माण केले जाते.

सुंदरतेचे अनेक आदर्श असू शकतात, ह्या सिद्धांतावर स्थापन केलेले रूपभम नैसर्गिक अर्क आणि सौंदर्य-रसायनशास्त्र यांची सांगड घालून खास उत्पादने तयार करते जी अतिशय संवेदनशील त्वचेला पण जोपासतात. रूपभमची पुरुष आणि स्त्री दोन्हीसाठी त्वचा, शरीर आणि केस यांची निगा राखणारी उत्पादने आहेत.
आमची उत्पादने ‘क्रूरता मुक्त’ आहेत.