मुख्यपृष्ठ  /  आमच्या बद्दल  /  संचालकांकडून संदेश
Mesage from the Directors

संचालकांकडून संदेश :-

shadow

MR. SANJEEV CHHIBBER / श्री संजीव छिब्बर

Director / संचालक

अंतः करणातून एक आवेशी खेळाडू, श्री संजीव छिब्बर यांनी नेहमी परिपूर्ण धैर्य आणि उत्कटतेने अज्ञात क्षेत्रांत कार्य केले. ग्लेज ट्रेडिंग इंडिया (Glaze trading India) चे संस्थापक सदस्य आणि संपूर्ण वेळ संचालक, श्री संजीव छिब्बर यांनी आपल्या घरातील खर्चामध्ये योगदान देण्यासाठी एक स्थिर नोकरीच्या शोधासह थेट विक्री उद्योगामध्ये परिश्रमपूर्वक प्रवासाची सुरुवात केली.

आपली अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिथिती अनेक अडचणी असूनही त्यांची मोठे यश प्राप्त करण्याची इच्छेला नाउमेद केले जाऊ शकले नाही. अंतःकरणातून एक लोकांचा माणूस म्हणून ते आपल्या स्वपांना पूर्ण करण्यासाठी हळू हळू पुढे प्रगती करीत राहिले. थेट विक्रीच्या व्यवसायातील त्यांचा प्रारंभिक संघर्षाने फक्त त्यांच्या उर्वरित मोहीमेस आकार दिला नाही, तर त्यांना त्यांच्या भविष्यातील मार्गाची सुद्धा जाणीव करून दिली.

भारतीय थेट विक्री व्यवसायास नवीन पातळीवर नेण्यासाठी प्रेरित होवून, श्री संजीव छीब्बर यांची ग्लेज ट्रेडिंग इंडिया (Glaze Trading India) साठी महत्वाकांक्षी योजना आहेत. आपल्या भारताबाहेरील व्यवसाय धोरणाचा एक भाग त्यांची सर्व जगभर ग्लेज (Glaze) चे एक व्यापक नेटवर्क स्थापन करण्याची योजना आहे आणि ते विविध जाती, पंथ आणि समाजाच्या लोकांना आकर्षक व्यवसाय संधी प्रदान करतात.

“जे निर्धारपूर्वक अडचणींचा सामना करतात त्यांच्यासाठी नियती मार्ग निर्माण करेल”


Managment

MR. CHETAN HANDA / श्री चेतन हंडा

Director / संचालक

तरुण आणि प्रेरणादायी उद्योजक, श्री चेतन यांनी छोटी सुरुवात केली आणि मोठी स्वप्ने बघितली आणि भारतातील एकमेव थेट विक्री कंपन्या ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. (Glaze Trading India Pvt. Ltd.) निर्माण करण्यासाठी धैर्य आणि चिकाटी यांच्या संयोजनाचा वापर केला. त्यांच्या आर्थिक अडचणी आणि मर्यादित संसाधने यामुळे त्यांना आपला व्यवसाय साधेपणाने सुरु करावा लागला परंतु त्यामुळे त्यांना मोठी स्वप्ने बघण्यापासून परावृत्त केले जाऊ शकले नाही.

विज्ञान पदवीधर आणि फायनँसमध्ये एमबीए प्राप्त केलेले श्री चेतन हंडा यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात साधेपणाने केली. तथापि, त्यांनी लवकरच एक आकर्षक कल्पना विकसित केली आणि अशा प्रकारे 2003 मध्ये ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. (Glaze trading India Pvt. Ltd.) चा जन्म झाला. 'पैशासाठी मूल्य' प्राप्त करून देण्यासाठी आणि थेट विक्री व्यवसायात आदर्श संधी निर्माण करण्याची बांधिलकी ठेवून, ते यशस्वीपणे नियतीशी जवळकी साधतात आणि आपल्या उद्यामाला उंच शिखरावर नेवून सोडतात.

बाकीचे ते जसे म्हणतात त्याप्रमाणे एक इतिहास आहे. नैतिकतेकडे कल असलेले श्री चेतन हंडा यांनी भारतीय थेट विक्री उद्योगाला प्रामाणिक कार्यरत वातावरण प्रदान करून नवीन आकार देण्याचा निर्धार केलेला आहे. त्यांचा या गोष्टीवर नेहमी विश्वास आहे की भारतासारख्या वैविध्यपूर्ण संस्कृतीत नेटवर्क मार्केटिंगला चांगली संधी आहे कारण हा व्यवसाय संबंध निर्मितीसाठी आहे आणि फक्त उत्पादनचा धंदा करण्याविषयी नव्हे. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्तता उत्पादने आणि सेवा आणि व्यापक व्यवसाय संभावना प्रदान करण्याची इच्छा आहे. कंपनीसाठी त्यांच्या वृद्धीच्या धोरणाचा एक भाग म्हणून, भारतीय थेट विक्री व्यवसाय अनेक ठिकाणी सुरु करण्याची आणि सर्व जगभरातील एक यशस्वी नेटवर्क स्थापन करण्याची त्यांनी एक योजना आखली आहे.

“यश अंतिम नाही, अपयश प्राणघातक नाही. खरी महत्वाची बाब आहे पुढे चालत राहण्याचे धैर्य”


Managment

MR. SARABJEET SINGH / श्री सरबजीत सिंह

Additional Director / अतिरिक्त संचालक

श्री सरबजीत सिंह, वाणिज्य पदवीधर, हे ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. (Glaze Trading India Pvt. Ltd.) मध्ये विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख आहेत. अभिनव, अपारंपारिक आणि प्रगतीशील कल्पनांनी प्रेरीत होवून. सरबजीत सिंह हे कंपनीच्या बोर्डवर अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. यशासाठी भुकेले होऊन आणि यशस्वी होण्याची इच्छा उरी बाळगून, त्यांनी छोटीशी सुरवात केली परंतु मोठे यश गाठले. उद्योजक दृष्टिकोन आणि हेतू यांच्याद्वारे प्रेरित त्यांच्या विक्री प्रशिक्षण विभागाने ग्लेज ट्रेडिंग इंडिया (Glaze Trading India) साठी सर्वात कार्यक्षम विक्री संघाची निर्मिती केली आहे. त्यांचे वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रेरक नेतृत्व यांच्याद्वारे ग्लेज (Glaze) विक्री संघ सतत सकारात्मक बदल अनुभवत आहे.

श्री सरबजीत सिंह यांचे भारतीय थेट विक्री व्यवसायाची नैतिकदृष्ट्या प्रेरित प्रतिमा स्थापन करण्याचे स्वप्न आहे. त्याच प्रमाणात कंपनीसाठी आपल्या भावी विकास धोरणाचा एक भाग म्हणून, थेट विक्री व्यवसायास भारतात ज्या प्रकारे प्रदर्शित केले जाते यामध्ये बदल करण्यासाठी त्यांनी कंपनीच्या विक्री शक्तीमध्ये सुधारणा घडवून आणणारे बदल करण्याची योजना आखली आहे.

“नेते उदाहरणांद्वारे नेतृत्व करता फक्त शब्दांद्वारे नाही”


Managment

MR. SUMIT KOHLI / श्री सुमित कोहली

Additional Director / अतिरिक्त संचालक

श्री सुमित कोहली, वाणिज्य पदवीधर, ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा लि. (Glaze Trading India Pvt. Ltd.) मध्ये कार्य विभागाचे प्रमुख आहेत. ते कंपनीच्या बोर्डवर अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. श्री सुमित कोहली यांनी पूर्ण निर्धार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपली ध्येय प्राप्त केली आणि एक अतिशय तरुण वयात वरिष्ठ व्यवस्थापनात स्थान मिळविले आहे. आपल्या वैयक्तिक देखरेखीखाली सेवा संबंधित अडचणी व तक्रारी निवारण करण्याचे कार्य करणारे श्री सुमित कोहली हे संपूर्ण नेटवर्कच्या सुरळीत कामकाजासाठी जबाबदार आहेत.

ग्लेज (Glaze) बरोबर श्री सुमित कोहली यांच्या प्रवासास सन 2003 मध्ये सुरुवात झाली आणि तेव्हापासून ते कंपनी अविभाज्य भाग बनले आहेत. तपशिलावर लक्ष ठेवण्याची आवड असलेले श्री सुमित कोहली हे उत्साहाने सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी प्रेरित आहेत. ग्राहक आणि विक्री भागीदार यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करून विद्यमान थेट विक्री व्यवसायात वेगळे बदल घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

“मनुष्याने ठरविले तर तो काहीही करू शकतो”