श्री. संजीव छिब्बरफाउंडर डायरेक्टर

“जितका कठीण संघर्श असेल विजय तितकाच शानदार असेल.”

बुलंद इरादे आणि उच्च विचार ठेवणारे श्री. संजीव छिब्बर साहस व जुनूनच्या बळावर प्रत्येक मोठ्या आव्हानाला हरवण्याचे कौशल्य बाळगतात. कर्म क्षेत्र भले ही कोणतेही असो, सफलतेच्या प्रत्येक लक्ष्याला भेदणे ह्यांना येते. ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. चे फाउंडर डायरेक्टर श्री. संजीव छिब्बर एका कसलेल्या उद्योजकाप्रमाणे आपल्या यशाचे श्रेष्ठत्व प्रत्येक क्षेत्रात मान्य करायला लावतात. कधी काळी घरखर्चात आपले योगदान देण्यासाठी नोकरीच्या शोधात असलेल्या श्री. संजीव छिब्बर ह्यांनी डायरेक्ट सेलिंगच्या उद्योगापासून आपल्या अजेय आणि दीर्घकालीन प्रवासाची सुरवात केली होती. यद्यपि सुरवातीला संघर्षाच्या काट्यांनी भरलेले मार्ग आले पण त्यांनी त्या परिस्थितींना आणि असफलतांना आपल्या यशाचा आधार बनवले. सर्वांचे लाडके आणि विनम्र स्वभावाचे मालक श्री. संजीव छिब्बर ह्यांनी आपल्या एकेका पावलाला आपल्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याच्या दिशेने टाकले.

भारतात डायरेक्ट सेलिंग व्यवसायाला सन्मान व ओळख देऊन एका नव्या उंचीवर पोचवण्यासाठी दृढ-संकल्पित श्री. संजीव छिब्बर ह्यांनी ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. साठी एक महत्त्वाकांक्षी बिझनेस प्लॅन तयार केला आहे. आपल्या विश्व-व्यापार रणनीतिच्या एका हिस्स्याच्या अंतर्गत त्यांनी जागतिक स्तरावर गॅलवे बिझनेसच्या दाट नेटवर्कच्या विस्तारासाठी विविध जाती, समुदाय आणि धर्माच्या लोकांना एक प्रभावी व्यवसाय संधी सादर करण्याची योजना बनवली आहे.

श्री. चेतन हांडाफाउंडर डायरेक्टर

“अपयश जीवनाचा अंत नाही परंतु यशाची सुरवात आहे.”

कोणीही व्यक्ती आपल्या आकाराने नाही, तर आपल्या विचाराने मोठा होतो आणि त्याच्या विचाराचा हाच आकार त्याला स्वतःच्या स्वप्नांना साकारण्यात मदत करतो. ही गोष्ट युवा ऊर्जेने ओतप्रोत उद्योजक श्री. चेतन हांडा ह्यांच्या जीवनाला अचूक लागू होते. श्री. चेतन हांडा ह्यांनी आपल्या करियरची सुरवात भलेही लहान प्रमाणावर केली होती परंतु त्यांची स्वप्ने खूप मोठी होती. म्हणून धैर्य आणि दृढतेच्या संयोजनामुळे ते भारताची स्वतःप्रमाणेच अद्भुत डायरेक्ट सेलिंग कंपनी ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. चे सह-संस्थापक बनले.

विज्ञान शाखेचे पदवीधर आणि फायनान्समध्ये एमबीए केलेल्या श्री. चेतन हांडा ह्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरवात अत्यंत विनम्र पद्धतीने केली. परंतु खूप लवकर त्यांनी एक मनोरंजक आणि उत्तम कल्पना शोधून काढली, ज्याच्या परिणामस्वरूप वर्ष 2003 मध्ये ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. चा उदय झाला. डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये आदर्ष संधींच्या निर्माणाबाबत प्रतिबद्ध श्री. चेतन हांडा हळू-हळू यषाकडे जात राहिले आणि या व्यवसायात एक नवीन टप्पा प्राप्त केला.

नैतिक मूल्यांचे धनी श्री. चेतन हांडा नेहमीच कामात पारदर्शकता व उत्तम वातावरण निर्माण करून भारतीय डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला नवीन व मजबूत आकार देण्यासाठी समर्पित आहेत. त्यांना नेहमी विश्वास राहिला आहे की भारतासारख्या सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात नेटवर्किंग मार्केटिंगसारख्या बिझनेसच्या विकासाच्या अमर्यादित शक्यता आहेत, ज्यात फक्त उत्पादनांची देवाण-घेवाणच नाही, परंतु नवनवीन नातीही बनतात. या बिझनेसद्वारे त्यांचा उद्देश उपयोगी उत्पादने, सेवा आणि व्यवसाय शक्यतांचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणे आहे. कंपनीच्या विकासाच्या रणनीतिच्या अंतर्गत त्यांची योजना भारतीय डायरेक्ट सेलिंग व्यवसायाला जगभरात पसरवणे आणि एक समृद्ध नेटवर्क स्थापन करण्याची आहे.

श्री. सरबजीत सिंह अरनेजा डायरेक्टर

“तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयींना बदलू शकता आणि निश्चित रूपाने तुमच्या सवयी तुमचे भविष्य बदलू शकतात.”

लीडरशिप आणि बिझनेसच्या प्रत्येक मोर्च्यावर निष्णात श्री. सरबजीत सिंह वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत आणि आपल्या नवीन, अपारंपरिक आणि प्रगतीशील विचारांसह ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. च्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी पार पाडत आहेत. श्री. सरबजीत सिंह अरनेजा कंपनीचे निदेशक देखील आहेत. कोणत्याही परिस्थितीत यश प्राप्त करण्याची हिंमत बाळगणारे श्री. सरबजीत सिंह अरनेजा ह्यांनी लहान सुरवातीपासून मोठे यश संपादन केले आहे. त्यांचे अद्भुत ट्रेनिंग मॉड्यूल, उद्योजकीय अॅप्रोचमुळे ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. मध्ये योग्य आणि सक्षम सेल्सचे गठन झाले आहे. श्री. सरबजीत सिंह अरनेजा ह्यांच्या बहुमुखी प्रतिभाषाली नेतृत्वात ग्लेजची सेल्स टीम सतत सकारात्मक रूपाने मजबूत होत आहे.

श्री. सरबजीत सिंह अरनेजांची परिकल्पना इंडियन डायरेक्ट सेलिंग व्यवसायाची एक साफ आणि नैतिकदृष्ट्या मजबूत छबि स्थापन करणे आहे. कंपनीच्या भविष्यातील विकासाच्या रणनीतिच्या अंतर्गत ते कंपनीच्या सेल्स फॉर्समध्ये असा सकारात्मक बदल आणू इच्छितात जो भारतात डायरेक्ट सेलिंगच्या परिदृष्याला पूर्णपणे बदलून टाकेल.

श्री. सुमित कोहली डायरेक्टर

“मनुष्याने ठरवले तर तो अशक्य वाटणार्या प्रत्येक कामाला शक्य करू शकतो.”

आत्मविश्वासाने ओतप्रोत आणि स्वभावाने अत्यंत विनम्र श्री. सुमित कोहली ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. च्या ऑपरेशन डिव्हीजनच्या प्रमुखासह कंपनीच्या निदेशक पदाची जबाबदारी पण सांभाळत आहेत. श्री. सुमित कोहली ह्यांनी संकल्प आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपल्या ध्येयाला प्राप्त केले आणि खूपच कमी वेळात कंपनीच्या प्रमुख व्यवस्थापनात आपले मजबूत स्थान बनवले. कंपनीच्या सेवा व संचालन संबंधित तक्रारींचे व्यक्तीगत देखरेखीत पर्यवेक्षण करणारे श्री. सुमित कोहली कंपनीच्या संपूर्ण नेटवर्कचे सुव्यवस्थित रूपाने संचालन करण्यासाठी जबाबदार आहेत.

ग्लेजबरोबर श्री. सुमित कोहलींच्या प्रवासाची सुरवात वर्ष 2003 मध्ये झाली आणि तेव्हापासून ते कंपनीचा एक अभिन्न भाग आहेत. अत्यंत पारखी नजर असणारे श्री. सुमित कोहली ग्राहक आणि विक्री भागीदारांना उत्कृष्ट सेवा देऊन सध्याच्या डायरेक्ट सेलिंग व्यवसायात उल्लेखनीय बदल आणण्यासाठी प्रतिबद्ध आहेत.

श्री. संजय वर्माडायरेक्टर

“विचाराने कार्याची उत्पत्ति होते, कर्माने सवयीची उत्पत्ति होते आणि चरित्राने तुमच्या भाग्याची उत्पत्ति होते.”

लुधियाना, पंजाबच्या एका सामान्य कुटूंबात जन्मलेले श्री. संजय वर्मा बालपणापासूनच महत्त्वाकांक्षी आणि प्रतिभाषाली व्यक्तिमत्त्वाचे स्वामी राहिले आहेत. स्वभावाने हसतमुख आणि व्यवसायाच्या खुबींमध्ये निश्णात श्री. संजय वर्मा प्रत्येक कामाला नीटनेटकेपणासह जरा वेगळ्या अंदाजात करण्यासाठी ओळखले जातात. म्हणून आपले पदवीचे षिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोणत्याही सरकारी नोकरीत जाण्याऐवजी व्यवसायात यश मिळविण्याचे ठरवले आणि आज ग्लेजमध्ये डायरेक्टर म्हणून आपली अभूतपूर्व सेवा देत आहेत.

श्री. संजय वर्मा ह्यांनी संपूर्ण देषात गॅलवे बिझनेसच्या प्रसाराची जबाबदारी अत्यंत कुशलतापूर्वक निभावत उल्लेखनीय यष संपादन केले आहे. बहुमुखी प्रतिभेचे धनी श्री. संजय वर्मा आज ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. च्या मार्केटिंग विभागाचे सफलतापूर्वक नेतृत्व करण्याबरोबरच गॅलवे बिझनेसला यशाच्या नित्य नव्या शिखरांवर घेऊन जात आहे.