गॅलवे फाउंडेशन, डायरेक्ट सेलिंगच्या अग्रगण्य कंपन्यांमधील एक ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. ची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) विंग आहे. ऑगस्ट, 2015 मध्ये गॅलवे फाउंडेशनची सुरवात कंपनीचे फाउंडर डायरेक्टर्स श्री. संजीव छिब्बर आणि श्री. चेतन हांडा यांनी या व्हिजनसह केली होती की त्याच्याद्वारे अशा एकीकृत समाजाच्या निर्माणात योगदान दिले जाऊ शकेल, जिथे प्रत्येकाला समान संधी मिळतील आणि सर्वांना आपल्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल. त्याचबरोबर हे ही सुनिश्चित होईल की यापासून देशभरात वंचित किंवा कमी विशेषाधिकार प्राप्त समुदायांची प्रगती आणि विकासाला प्रोत्साहन मिळेल.

गॅलवे फाउंडेशनचे एस.ई.पी. आणि डिजिटालय नावाचे दोन प्रमुख कार्यक्रम आहेत. गॅलवे फाउंडेशनचा एस.ई.पी. कार्यक्रम लोकांना आध्यात्मिक रूपाने विकसित करण्याबरोबर त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीला स्वीकार करण्यात मदत करून त्यांच्या आंतरिक क्षमतेची जाणीव करून देतो तिथेच डिजिटालयचा उद्देश त्या लोकांना निःशुल्क तांत्रिक प्रशिक्षण देणे आहे, ज्यांच्याजवळ कॉम्प्यूटरचा उपयोग करण्याबाबत कोणतीही माहिती नाहीये म्हणजे त्यांचे आयटी कौशल्य मजबूत होईल आणि पुढे जाऊ ते देशाची महत्त्वाकांक्षी योजना डिजिटल इंडिया मिशनमध्ये आपले सकारात्मक योगदान देऊ शकतील.

अशा प्रकारे, गॅलवे फाउंडेशन आपल्या कॉर्पोरेट सोषल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत उच्च आदर्शांसह लोकांना आध्यात्मिक आणि तांत्रिक ज्ञान प्रदान करते.